Home Marathi
 

Dasbodh dashak - 4 by स्वामी रामदास समर्थ

[Oct 31, 2007]

.. समर्थ रामदासांचा दासबोध दशक ४ .. . . . .
.. नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥ ४॥
. . समास पहिला. : . श्रवणभक्ति . . . . . .
॥ श्रीराम ॥
जयजय जी गणनाथा। तूं विद्यावैभवें समर्था । अध्यात्मविद्येच्या परमार्था। मज बोलवावें ॥ १॥
 नमूं शारदा वेदजननी। सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं। स्फूर्तिरूपें ॥ २॥
 आतां आठौउं सद्गुरु। जो पराचाहि परु । जयाचेनि ज्ञानविचारु। कळों लागे ॥ ३॥
श्रोतेन पुसिलें बरवें। भगवद्भजन कैसें करावें । म्हणौनि बोलिलें स्वभावें। ग्रंथांतरीं ॥ ४॥
सावध होऊन श्रोतेजन। ऐका नवविधा भजन । सत्शास्त्रीं बोलिले, पावन- । होईजे येणें ॥ ५॥
॥ श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम . . . . अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम ॥ नवविधा भजन बोलिलें। तेंचि पुढें प्रांजळ केलें । श्रोतीं अवधान दिधलें। पाहिजे आतां ॥ ६॥
प्रथम भजन ऐसें जाण। हरिकथापुराणश्रवण । नाना अध्यात्मनिरूपण। ऐकत जावें ॥ ७॥
 कर्ममार्ग उपासनामार्ग। ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग । योगमार्ग वैराग्यमार्ग। ऐकत जावे ॥ ८॥
नाना व्रतांचे महिमे। नाना तीर्थांचे महिमे । नाना दानांचे महिमे। ऐकत जावे ॥ ९॥
 नाना माहात्म्यें नाना स्थानें। नाना मंत्र नाना साधनें । नाना तपें पुरश्चरणें। ऐकत जावीं ॥ १०॥
 दुग्धाहारी निराहारी। फळाहारी पर्णाहारी । तृणाहारी नानाहारी। कैसे ते ऐकावे ॥ ११॥
 उष्णवास जळवास। सीतवास आरण्यवास । भूगर्भ आणी आकाशवास। कैसे ते ऐकावे ॥ १२॥
 जपी तपी तामस योगी। नाना निग्रह हटयोगी । शाक्ताअगम आघोरयोगी। कैसे ते ऐकावे ॥ १३॥
 नाना मुद्रा नाना आसनें। नाना देखणीं लक्षस्थानें । पिंडज्ञानें तत्वज्ञानें। कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥
 नाना पिंडांची रचना। नाना भूगोळरचना । नाना सृष्टीची रचना। कैसी ते ऐकावी ॥ १५॥
चंद्र सूर्य तारामंडळें। ग्रहमंडळें मेघमंडळें । येकवीस स्वर्गें सप्त पाताळें। कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥
ब्रह्माविष्णुमहेशस्थानें। इन्द्रदेवऋषीस्थानें । वायोवरुणकुबेरस्थानें। कैसीं ते ऐकावीं ॥ १७॥
 नव खंडे चौदा भुवनें। अष्ट दिग्पाळांची स्थानें । नाना वनें उपवनें गहनें। कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥
 गण गंधर्व विद्याधर। येक्ष किन्नर नारद तुंबर । अष्ट नायका संगीतविचार। कैसा तो ऐकावा ॥ १९॥
 रागज्ञान ताळज्ञान। नृत्यज्ञान वाद्यज्ञान । अमृतवेळ प्रसंगज्ञान। कैसें तें ऐकावें ॥ २०॥
 चौदा विद्या चौसष्टी कळा। सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा। कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥
 मंत्र मोहरे तोटके सिद्धी। नाना वल्ली नाना औषधी । धातु रसायण बुद्धी। नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥
 कोण्या दोषें कोण रोग। कोणा रोगास कोण प्रयोग । कोण्या प्रयोगास कोण योग। साधे तो ऐकावा ॥ २३॥
रवरवादि कुंभपाक। नाना यातना येमेलोक । सुखसुःखादि स्वर्गनर्क। कैसा तो ऐकावा ॥ २४॥
कैशा नवविधा भक्ती। कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तम गती। ऐसें हें ऐकावें ॥ २५॥
पिंडब्रह्मांडाची रचना। नाना तत्वविवंचना । सारासारविचारणा। कैसी ते ऐकावी ॥ २६॥
सायोज्यता मुक्ती कैसी होते। कैसें पाविजे मोक्षातें । याकारणें नाना मतें। शोधित जावीं ॥ २७॥
 वेद शास्त्रें आणी पुराणें। माहावाक्याचीं विवरणें । तनुशतुष्टयनिर्शनें। कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥
ऐसें हें अवघेंचि ऐकावें। परंतु सार शोधून घ्यावें । असार तें जाणोनि त्यागावें। या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥
 सगुणाचीं चरित्रें ऐकावीं। कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं । श्रवणभक्तीचीं जाणावीं। लक्षणें ऐसीं ॥ ३०॥
सगुण देवांचीं चरित्रें। निर्गुणाचीं तत्वें यंत्रें । हे दोनी परम पवित्रें। ऐकत जावीं ॥ ३१॥
जयंत्या उपोषणें नाना साधनें। मंत्र यंत्र जप ध्यानें । कीर्ति स्तुती स्तवनें भजनें। नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥
ऐसें श्रवण सगुणाचें। अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें । विभक्ती सांडून भक्तीचें। मूळ शोधावें ॥ ३३॥
 श्रवणभक्तीचें निरूपण। निरोपिलें असे जाण । पुढें कीर्तन भजनाचें लक्षण। बोलिलें असे ॥ ३४॥
 इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्तिनिरूपणनाम . . . . समास पहिला ॥ १॥

समास दुसरा. : . किर्तन भक्ति . . . . . .
॥ श्रीराम ॥
 श्रोतीं भगवद्भजन पुसिलें। तें नवविधा प्रकारें बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें। दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥
सगुण हरिकथा करावी। भगवत्कीर्ती वाढवावी । अक्षंड वैखरी वदवावी। येथायोग्य ॥ २॥
बहुत करावें पाठांतर। कंठीं धरावें ग्रन्थांतर । भगवत्कथा निरंतर। करीत जावी ॥ ३॥
अपुलिया सुखस्वार्था। केलीच करावी हरिकथा । हरिकथेवीण सर्वथा। राहोंचि नये ॥ ४॥
नित्य नवा हव्यास धरावा। साक्षेप अत्यंतचि करावा । हरिकीर्तनें भरावा। ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥
 मनापासून आवडी। जीवापासून अत्यंत गोडी । सदा सर्वदा तांतडी। हरिकीर्तनाची ॥ ६॥
 भगवंतास कीर्तन प्रिये। कीर्तनें समाधान होये । बहुत जनासी उपाये। हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥
विविध विचित्रें ध्यानें। वर्णावीं आळंकार भूषणें । ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥
येश कीर्ति प्रताप महिमा। आवडीं वर्णावा परमात्मा । जेणें भगवद्भक्तांचा आत्मा। संतुष्ट होये ॥ ९॥
कथा अन्वय लापणिका। नामघोष करताळिका । प्रसंगें बोलाव्या अनेका। धात माता नेमस्त ॥ १०॥
 ताळ मृदांग हरिकीर्तन। संगीत नृत्य तान मान । नाना कथानुसंधान। तुटोंचि नेदावें ॥ ११॥
 करुणा कीर्तनाच्या लोटें। कथा करावी घडघडाटें । श्रोतयांचीं श्रवणपुटें। आनंदें भरावीं ॥ १२॥
कंप रोमांच स्फुराणें। प्रेमाश्रुसहित गाणें । देवद्वारीं लोटांगणें। नमस्कार घालावे ॥ १३॥
 पदें दोहडें श्लोक प्रबंद। धाटी मुद्रा अनेक छंद । बीरभाटिंव विनोद। प्रसंगें करावे ॥ १४॥
नाना नवरसिक श्रृंघारिक। गद्यपद्याचें कौतुक । नाना वचनें प्रस्ताविक। शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥
 भक्तिज्ञान वैराग्य लक्षण। नीतिन्यायस्वधर्मरक्षण । साधनमार्ग अध्यात्मनिरूपण। प्रांजळ बोलावें ॥ १६॥
 प्रसंगें हरिकथा करावी। सगुणीं सगुणकीर्ति धरावी । निर्गुणप्रसंगें वाढवावी। अध्यात्मविद्या ॥ १७॥
पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त । बहुधा बोलणें अव्यावेस्त। बोलोंचि नये ॥ १८॥
करावें वेदपारायेण। सांगावें जनासी पुराण । मायाब्रह्मीचें विवरण। साकल्य वदावें ॥ १९॥
ब्राह्मण्य रक्षावें आदरें। उपासनेचीं भजनद्वारें । गुरुपरंपरा निर्धारें। चळोंच नेदावी ॥ २०॥
 करावें वैराग्यरक्षण। रक्षावें ज्ञानाचें लक्षण । परम दक्ष विचक्षण। सर्वहि सांभाळी ॥ २१॥
कीर्तन ऐकतां संदेह पडे। सत्य समाधान तें उडे । नीतिन्यायसाधन मोडे। ऐसें न बोलावें ॥ २२॥
सगुणकथा या नांव कीर्तन। अद्वैत म्हणिजे निरूपण । सगुण रक्षून निर्गुण। बोलत जावें ॥ २३॥
असो वक्त्रुत्वाचा अधिकार। अल्पास न घडे सत्योत्तर । वक्ता पाहिजे साचार। अनुभवाचा ॥ २४॥
सकळ रक्षून ज्ञान सांगे। जेणें वेदज्ञा न भंगे । उत्तम सन्मार्ग लागे। प्राणीमात्रासी ॥ २५॥
असो हें सकळ सांडून। करावें गुणानुवादकीर्तन । या नांव भगवद्भजन। दुसरी भक्ती ॥ २६॥
 कीर्तनें माहादोष जाती। कीर्तनें होये उत्तमगती । कीर्तनें भगवत्प्राप्ती। येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥
 कीर्तनें वाचा पवित्र। कीर्तनें होये सत्पात्र । हरिकीर्तनें प्राणीमात्र। सुसिळ होती ॥ २८॥
 कीर्तनें अवेग्रता घडे। कीर्तनें निश्चये सांपडे । कीर्तनें संदेह बुडे। श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥
सदा सर्वदा हरिकीर्तन। ब्रह्मसुत करी आपण । तेणें नारद तोचि नारायेण। बोलिजेत आहे ॥ ३०॥
म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा। कीर्तनें संतोषे परमात्मा । सकळ तीर्थें आणी जगदात्मा। हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥
 इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनभजननिरूपणनाम . . . . समास दुसरा ॥ २॥

समास तिसरा. : . नामस्मरणभक्ति . . . . . .
॥ श्रीराम ॥
 मागां निरोपिलें कीर्तन। जें सकळांस करी पावन । आतां ऐका विष्णोःस्मरण। तिसरी भक्ती ॥ १॥
 स्मरण देवाचें करावें। अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें। समाधान ॥ २॥
नित्य नेम प्रातःकाळीं। माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं। करीत जावें ॥ ३॥
 सुख दुःख उद्वेग चिंता। अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा। राहोंच नये ॥ ४॥
 हरुषकाळीं विषमकाळीं। पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं। नामस्मरण करावें ॥ ५॥
 कोडें सांकडें संकट। नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट। नामस्मरण करावें ॥ ६॥
 चालतां बोलतां धंदा करितां। खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां। नाम विसरों नये ॥ ७॥
संपत्ती अथवा विपत्ती। जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती। सांडूंच नये ॥ ८॥
 वैभव सामर्थ्य आणी सत्ता। नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां। नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥
आधीं आवदसा मग दसा। अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा। परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥
नामें संकटें नासतीं। नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें पाविजेती। उत्तम पदें ॥ ११॥
भूत पिशाच्च नाना छंद। ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद। नामनिष्ठें नासती ॥ १२॥
 नामें विषबाधा हरती। नामें चेडे चेटकें नासती । नामें होये उत्तम गती। अंतकाळीं ॥ १३॥
बाळपणीं तारुण्यकाळीं। कठिणकाळीं वृधाप्यकाळीं । सर्वकाळीं अंतकाळीं। नामस्मरण असावें ॥ १४॥
नामाचा महिमा जाणे शंकर। जना उपदेसी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र। रामनामेंकरूनी ॥ १५॥
उफराट्या नामासाठीं। वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी। चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥
 हरिनामें प्रल्हाद तरला। नाना आघातापासून सुटला । नारायेणनामें पावन जाला। अजामेळ ॥ १७॥
 नामें पाषाण तरले। असंख्यात भक्त उद्धरले । माहापापी तेचि जाले। परम पवित्र ॥ १८॥
परमेश्वराचीं अनंत नामें। स्मरतां तरिजे नित्यनेमें । नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥
 सहस्रा नामामधें कोणी येक। म्हणतां होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक। होईजे स्वयें ॥ २०॥
 कांहींच न करूनि प्राणी। रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी। भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥
नाम स्मरे निरंतर। तें जाणावें पुण्यशरीर । माहादोषांचे गिरिवर। रामनामें नासती ॥ २२॥
 अगाध महिमा न वचे वदला। नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला। प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥
चहुं वर्णां नामाधिकार। नामीं नाहीं लाहानथोर । जढ मूढ पैलपार। पावती नामें ॥ २४॥
म्हणौन नाम अखंड स्मरावें। रूप मनीं आठवावें । तिसरी भक्ती स्वभावें। निरोपिली ॥ २५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरणभक्तिनिरूपणनाम . . . . समास तिसरा ॥ ३॥

समास चवथा. : . पादसेवन भक्ति . . . . . .
॥ श्रीराम ॥
 मागां जालें निरूपण। नामस्मरणाचें लक्षण । आतां ऐका पादसेवन। चौथी भक्ती ॥ १॥
पादसेवन तेंचि जाणावें। कायावाचामनोभावें । सद्गुरूचे पाय सेवावे। सद्गतिकारणें ॥ २॥
 या नांव पादसेवन। सद्गुरुपदीं अनन्यपण । निरसावया जन्ममरण। यातायाती ॥ ३॥
सद्गुरुकृपेविण कांहीं। भवतरणोपाव तों नाहीं । याकारणें लवलाहीं। सद्गुरुपाय सेवावे ॥ ४॥
 सद्वस्तु दाखवी सद्गुरु। सकळ सारासारविचारु । परब्रह्माचा निर्धारु। अंतरीं बाणे ॥ ५॥
जे वस्तु दृष्टीस दिसेना। आणी मनास तेहि भासेना । संगत्यागेंविण ये ना। अनुभवासी ॥ ६॥
 अनुभव घेतां संगत्याग नसे। संगत्यागें अनुभव न दिसे । हें अनुभवी यासीच भासे। येरां गथागोवी ॥ ७॥
 संगत्याग आणी निवेदन। विदेहस्थिती अलिप्तपण । सहजस्थिती उन्मनी विज्ञान। हे सप्तहि येकरूप ॥ ८॥
 याहिवेगळीं नामाभिधानें। समाधानाचीं संकेतवचनें । सकळ कांहीं पादसेवनें। उमजों लागे ॥ ९॥
 वेद वेदगर्भ वेदांत। सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत । अनुभव अनुर्वाच्य धादांत। सत्य वस्तु ॥ १०॥
बहुधा अनुभवाचीं आंगें। सकळ कळती संतसंगें । चौथे भक्तीचे प्रसंगें। गोप्य तें प्रगटे ॥ ११॥
प्रगट वसोनि नसे। गोप्य असोनि भासे । भासाअभासाहून अनारिसे। गुरुगम्य मार्ग ॥ १२॥
मार्ग होये परी अंतरिक्ष। जेथें सर्वहि पूर्वपक्ष । पाहों जातां अलक्ष। लक्षवेना ॥ १३॥
लक्षें जयासी लक्षावें। ध्यानें जयासी ध्यावें । तें गे तेंचि आपण व्हावें। त्रिविधा प्रचिती ॥ १४॥
 असो हीं अनुभवाचीं द्वारें। कळती सारासारविचारें । सत्संगेंकरून सत्योत्तरें। प्रत्ययासि येतीं ॥ १५॥
सत्य पाहातां नाहीं असत्य। असत्य पाहातां नाहीं सत्य । सत्याअसत्याचें कृत्य। पाहाणारापासीं ॥ १६॥
 पाहाणार पाहाणें जया लागलें। तें तद्रूपत्वें प्राप्त जालें । तरी मग जाणावें बाणलें। समाधान ॥ १७॥
नाना समाधानें पाहातां। बाणती सद्गुरु करितां । सद्गुरुविण सर्वथा। सन्मार्ग नसे ॥ १८॥
 प्रयोग साधनें सायास। नाना साक्षेपें विद्याअभ्यास । अभ्यासें कांहीं गुरुगम्यास। पाविजेत नाहीं ॥ १९॥
जें अभ्यासें अभ्यासितां न ये। जें साधनें असाध्य होये । तें हें सद्गुरुविण काये। उमजों जाणे ॥ २०॥
 याकारणें ज्ञानमार्ग- । कळाया, धरावा सत्संग । सत्संगेंविण प्रसंग। बोलोंचि नये ॥ २१॥
सेवावे सद्गुरूचे चरण। या नांव पादसेवन । चौथे भक्तीचें लक्षण। तें हें निरोपिलें ॥ २२॥
देव ब्राह्मण माहानुभाव। सत्पात्र भजनाचे ठाव । ऐसिये ठाईं सद्भाव। दृढ धरावा ॥ २३॥
हें प्रवृत्तीचें बोलणें। बोलिलें रक्षाया कारणें । परंतु सद्गुरुपाय सेवणें। या नांव पादसेवन ॥ २४॥
पादसेवन चौथी भक्ती। पावन करितसे त्रिजगतीं । जयेकरितां सायोज्यमुक्ती। साधकास होये ॥ २५॥
 म्हणौनि थोराहून थोर। चौथे भक्तीचा निर्धार । जयेकरितां पैलपार&#

Browse Pages

About स्वामी रामदास समर्थ
Categories

Did you know?
Neil Armstrong and Edwin Aldrin spent a total of 21 hours on the Moon, two-and-a-half of them outside the landing module.

Heh Heh Heh...
At the Wedding
Attending a wedding for the first time, a little girl whispered to her
mother, "Why is the bride dressed in white?"
"Because white is the color of happiness, and today is the happiest day of
her life."
The child thought about this for a moment, then said "So why is the groom
wearing black?"

© 2008 Saj Infotech • All rights reserved.