Home Marathi
 

Dasbodh dashak - 5 by स्वामी रामदास समर्थ

[Oct 31, 2007]

.. समर्थ रामदासांचा दासबोध दशक ५ .. . . . . ..
 मंत्रांचा पंचम दशक ..५ ..
 समास पहिला. : . गुरुनिश्चय . . . . . .
॥ श्रीराम ॥
 जय जज जी सद्गुरु पूर्णकामा। परमपुरुषा आत्मयारामा । अनुर्वाच्य तुमचा महिमा। वर्णिला न वचे ॥ १॥
 जें वेदांस सांकडें। जें शब्दासि कानडें । तें सत्शिष्यास रोकडें। अलभ्य लाभे ॥ २॥
 जें योगियांचें निजवर्म। जें शंकराचें निजधाम । जें विश्रांतीचें निजविश्राम। परम गुह्य अगाध ॥ ३॥
 तें ब्रह्म तुमचेनि योगें। स्वयें आपणचि होईजे आंगें । दुर्घट संसाराचेनि पांगें। पांगिजेना सर्वथा ॥ ४॥
 आतां स्वामिचेनि लडिवाळपणें। गुरुशिष्यांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें प्रमाणें - । मुमुक्षें शरण जावें ॥ ५॥
गुरु तों सकळांसी ब्राह्मण। जऱ्हीं तो जाला क्रियाहीन । तरी तयासीच शरण। अनन्यभावें असावें ॥ ६॥
 अहो या ब्राह्मणाकारणें। अवतार घेतला नारायेणें । विष्णूनें श्रीवत्स मिरविणें। तेथें इतर ते किती ॥ ७॥
ब्राह्मणवचनें प्रमाण। होती शूद्रांचे ब्राह्मण । धातुपाषाणीं देवपण। ब्राह्मणचेनि मंत्रें ॥ ८॥
मुंजीबंधनेंविरहित। तो शूद्रचि निभ्रांत । द्विजन्मी म्हणोनि सतंत। द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९॥
 सकळांसि पूज्य ब्राह्मण। हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्रमाण। अप्रिये भगवंता ॥ १०॥
 ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें। ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें। होणार नाहीं ॥ ११॥
 ब्राह्मण वेद मूर्तिमंत। ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ। विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥
 ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । होऊन, जडे भगवंतीं । ब्राह्मणतीर्थे उत्तम गती। पावती प्राणी ॥ १३॥
 लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण। आन यातिसि पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण। येरा चाड नाहीं ॥ १४॥
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती। तेथें मानव बापुडें किती । जरी ब्राह्मण मूढमती। तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥
 अंत्येज शब्दज्ञाता बरवा। परी तो नेऊन कायेए करावा । ब्राह्मणासन्निध पुजावा। हें तों न घडे कीं ॥ १६॥
जें जनावेगळें केलें। तें वेदें अव्हेरिलें । म्हणोनि तयासि नाम ठेविलें। पाषांडमत ॥ १७॥
असो जे हरिहरदास। तयास ब्राह्मणीं विस्वास । ब्राह्मणभजनें बहुतांस। पावन केलें ॥ १८॥
ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा। तरी किमर्थ सद्गुरु करावा । ऐसें म्हणाल तरी निजठेवा। सद्गुरुविण नाहीं ॥ १९॥
 स्वधर्मकर्मी।म पूज्य ब्राह्मण। परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण । ब्रह्मज्ञान नस्तां सीण। जन्ममृत्य चुकेना ॥ २०॥
 सद्गुरुविण ज्ञान कांहीं। सर्वथा होणार नाहीं । अज्ञान प्राणी प्रवाहीं। वाहातचि गेले ॥ २१॥
ज्ञानविरहित जें जें केलें। तें तें जन्मासि मूळ जालें । म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें। सुधृढ धरावीं ॥ २२॥
 जयास वाटे देव पाहावा। तेणें सत्संग धरावा । सत्संगेंविण देवाधिदेवा। पाविजेत नाहीं ॥ २३॥
नाना साधनें बापुडीं। सद्गुरुविण करिती वेडीं । गुरुकृपेविण कुडकुडीं। वेर्थचि होती ॥ २४॥
कार्तिकस्नानें माघस्नानें। व्रतें उद्यापनें दानें । गोरांजनें धूम्रपानें। साधिती पंचाग्नी ॥ २५॥
 हरिकथा पुराणश्रवण। आदरें करिती निरूपण । सर्व तीर्थें परम कठिण। फिरती प्राणी ॥ २६॥
झळफळित देवतार्चनें। स्नानें संध्या दर्भासनें । टिळे माळा गोपीचंदनें। ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥
अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें। मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें । नाना प्रकारीचीं उपकर्णें। साहित्यशोभा ॥ २८॥
घंटा घणघणा वाजती। स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती । आसनें मुद्रा ध्यानें करिती। प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९॥
 पंचायेत्न पूजा केली। मृत्तिकेचीं लिंगें लाखोली । बेलें नारिकेळें भरिली। संपूर्ण सांग पूजा ॥ ३०॥
 उपोषणें निष्ठा नेम। परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती, वर्म- । चुकले प्राणी ॥ ३१॥
येज्ञादिकें कर्में केलीं। हृदैइं फळाशा कल्पिली । आपले इछेनें घेतली। सूति जन्मांची ॥ ३२॥
करूनि नाना सायास। केला चौदा विद्यांचा अभ्यास । रिद्धि सिद्धि सावकास। वोळल्या जरी ॥ ३३॥
तरी सद्गुरुकृपेविरहित। सर्वथा न घडे स्वहित । येमेपुरीचा अनर्थ। चुकेना येणें ॥ ३४॥
जंव नाहीं ज्ञानप्राप्ती। तंव चुकेना यातायाती । गुरुकृपेविण अधोगती। गर्भवास चुकेना ॥ ३५॥
ध्यान धारणा मुद्रा आसन। भक्ती भाव आणी भजन । सकळहि फोल ब्रह्मज्ञान - । जंव तें प्राप्त नाहीं ॥ ३६॥
सद्गुरुकृपा न जोडे। आणी भलतीचकडे वावडे । जैसें आंधळें चाचरोन पडे। गारीं आणी गडधरां ॥ ३७॥
जैसें नेत्रीं घालितां अंजन। पडे दृष्टीस निधान । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान- । प्रकाश होये ॥ ३८॥
सद्गुरुविण जन्म निर्फळ। सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ। जाणार नाहीं ॥ ३९॥
सद्गुरुचेनि अभयंकरें। प्रगट होईजे ईश्वरें । संसारदुःखें अपारें। नासोन जाती ॥ ४०॥
मागें जाले थोर थोर। संत महंत मुनेश्वर । तयांसहि ज्ञानविज्ञानविचार। सद्गुरुचेनी ॥ ४१॥
श्रीरामकृष्ण आदिकरूनी। अतितत्पर गुरुभजनीं । सिद्ध साधु आणी संतजनीं। गुरुदास्य केलें ॥ ४२॥
सकळ सृष्टीचे चाळक। हरिहरब्रह्मादिक । तेहि सद्गुपदीं रंक। महत्वा न चढेती ॥ ४३॥
असो जयासि मोक्ष व्हावा। तेणें सद्गुरु करावा । सद्गुरुविण मोक्ष पावावा। हें कल्पांतीं न घडे ॥ ४४॥
 आतां सद्गुरु ते कैसे। नव्हेति इतरां गुरु ऐसे । जयांचे कृपेनें प्रकाशे। शुद्ध ज्ञान ॥ ४५॥
त्या सद्गुरूची वोळखण। पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे श्रोतीं श्रवण। अनुक्रमें करावें ॥ ४६॥
 इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयेनाम । । । । समास पहिला ॥ १॥

समास दुसरा. : . गुरुलक्षण . . . . . .
॥ श्रीराम ॥
जे करामती दाखविती। तेहि गुरु म्हणिजेती । परंतु सद्गुरु नव्हेती। मोक्षदाते ॥ १॥
 सभामोहन भुररीं चेटकें। साबरमंत्र कौटालें अनेकें । नाना चमत्कार कौतुकें। असंभाव्य सांगती ॥ २॥
 सांगती औषधीप्रयोग। कां सुवर्णधातूचा मार्ग । दृष्टिबंधनें लागवेग। अभिळाषाचा ॥ ३॥
 साहित संगीत रागज्ञान। गीत नृत्य तान मान । नाना वाद्यें सिकविती जन। तेहि येक गुरु ॥ ४॥
 विद्या सिकविती पंचाक्षरी। ताडेतोडे नानापरी । कां पोट भरे जयावरी। ते विद्या सिकविती ॥ ५॥
 जो यातीचा जो व्यापार। सिकविती भरावया उदर । तेहि गुरु परी साचार- । सद्गुरु नव्हेती ॥ ६॥
 आपली माता आणी पिता। तेहि गुरुचि तत्वतां । परी पैलापार पावविता। तो सद्गुरु वेगळा ॥ ७॥
 गाईत्रीमंत्राचा इचारू। सांगे तो साचार कुळगुरु । परी ज्ञानेंविण पैलपारु। पाविजेत नाहीं ॥ ८॥
 जो ब्रह्मज्ञान उपदेसी। अज्ञानांधारें निरसी । जीवात्मयां परमात्मयांसी। ऐक्यता करी ॥ ९॥
 विघडले देव आणी भक्त। जीवशिवपणें द्वैत । तया देवभक्तां येकांत- । करी, तो सद्गुरु ॥ १०॥
 भवव्याघ्रें घालूनि उडी। गोवत्सास तडातोडी । केली, देखोनि सीघ्र सोडी। तो सद्गुरु जाणावा ॥ ११॥
 प्राणी मायाजाळीं पडिलें। संसारदुःखें दुःखवलें । ऐसें जेणें मुक्त केलें। तो सद्गुरु जाणावा ॥ १२॥
 वासनानदीमाहांपुरीं। प्राणी बुडतां ग्लांती करी । तेथें उडी घालूनि तारी। तो सद्गुरु जाणावा ॥ १३॥
 गर्भवास अति सांकडी। इछाबंधनाची बेडी । ज्ञान देऊन सीघ्र सोडी। तो सद्गुरु स्वामी ॥ १४॥
 फोडूनि शब्दाचें अंतर। वस्तु दाखवी निजसार । तोचि गुरु माहेर। अनाथांचें ॥ १५॥
जीव येकदेसी बापुडें। तयास ब्रह्मचि करी रोकडें । फेडी संसारसांकडे। वचनमात्रें ॥ १६॥
 जें वेदांचे अभ्यांतरीं। तें काढून अपत्यापरी । शिष्यश्रवणीं कवळ भरी। उद्गारवचनें ॥ १७॥
वेद शास्त्र माहानुभाव। पाहातां येकचि अनुभव । तोचि येक गुरुराव। ऐक्यरूपें ॥ १८॥
 संदेह निःशेष जाळी ॥ स्वधर्म आदरें प्रतिपाळी । वेदविरहित टवाळी। करूंच नेणे ॥ १९॥
जें जें मन अंगिकारी। तें तें स्वयें मुक्त करी । तो गुरु नव्हे, भिकारी- । झडे आला ॥ २०॥
शिष्यास न लविती साधन। न करविती इंद्रियेंदमन । ऐसे गुरु आडक्याचे तीन। मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥
 जो कोणी ज्ञान बोधी। समूळ अविद्या छेदी । इंद्रियेंदमन प्रतिपादी। तो सद्गुरु जाणावा ॥ २२॥
येक द्रव्याचे विकिले। येक शिष्याचे आखिले । अतिदुराशेनें केले। दीनरूप ॥ २३॥
जें जें रुचे शिष्यामनीं। तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी। पडली गळां। २४॥
 जो गुरु भीडसारु। तो अद्धमाहून अद्धम थोरु । चोरटा मंद पामरु। द्रव्यभोंदु ॥ २५॥
जैसा वैद्य दुराचारी। केली सर्वस्वें बोहरी । आणी सेखीं भीड करी। घातघेणा ॥ २६॥
तैसा गुरु नसावा। जेणें अंतर पडे देवा । भीड करूनियां, गोवा- । घाली बंधनाचा ॥ २७॥
जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान। आणी स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान। दाखवी डोळां ॥ २८॥
देखणें दाखविती आदरें। मंत्र फु।म्किती कर्णद्वारें । इतुकेंच ज्ञान, तें पामरें- । अंतरलीं भगवंता ॥ २९॥
 बाणे तिहींची खूण। तोचि गुरु सुलक्षण । तेथेंचि रिघावें शरण। अत्यादरें मुमुक्षें ॥ ३०॥
अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता। परी विषैइं लोलंगता । ऐसिया गुरूचेनि सार्थकता। होणार नाहीं ॥ ३१॥
 जैसा निरूपणसमयो। तैसेंचि मनहि करी वायो । कृतबुद्धीचा जयो। जालाच नाहीं ॥ ३२॥
 निरूपणीं सामर्थ्य सिद्धी। श्रवण होतां दुराशा बाधी । नाना चमत्कारें बुद्धी। दंडळूं लागे ॥ ३३॥
 पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त। तयांसि सादृश्य भगवंत । आणी सामर्थ्यहि अद्भुत। सिद्धीचेनि योगें ॥ ३४॥
ऐसें तयांचें सामर्थ्य। आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ । ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ। अंतरीं वसे ॥ ३५॥
निशेष दुराशा तुटे। तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते वोखटे। शब्दज्ञाते कामिक ॥ ३६॥
 बहुत ज्ञातीं नागवलीं। कामनेनें वेडीं केलीं । कामना इच्छितांच मेलीं। बापुडीं मूर्खें ॥ ३७॥
 निशेष कामनारहित। ऐसा तो विरुळा संत । अवघ्यांवेगळें मत। अक्षै ज्याचें ॥ ३८॥
अक्षै ठेवा सकळांचा। परी पांगडा फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्वराचा। चुकोनि जाती ॥ ३९॥
 सिद्धि आणी सामर्थ्य जालें। सामर्थ्यें देहास महत्त्व आलें । तेणें वेंचाड वळकावलें। देहबुद्धीचें ॥ ४०॥
सांडूनि अक्षै सुख। सामर्थ्य इछिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख। आणीक कांहींच नाहीं ॥ ४१॥
 ईश्वरेंविण जे कामना। तेणेएंचि गुणें नाना यातना । पावती, होती पतना- । वरपडे प्राणी ॥ ४२॥
 होतां शरीरासी अंत। सामर्थ्यहि निघोन जात । सेखीं अंतरला भगवंत। कामनागुणें ॥ ४३॥
 म्हणोनि निःकामताविचारु। दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु। पाववी भवाचा ॥ ४४॥
मुख्य सद्गुरूचें लक्षण। आधीं पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचें समाधान। स्वरूपस्थिती ॥ ४५॥
याहीवरी वैराग्य प्रबळ। वृत्ति उदास केवळ । विशेष आचारें निर्मळ। स्वधर्मविषैइं ॥ ४६॥
याहिवरी अध्यात्मश्रवण। हरिकथा निरूपण । जेथें परमार्थविवरण। निरंतर ॥ ४७॥
 जेथें सारासारविचार। तेथें होये जगोद्धार । नवविधा भक्तीचा आधार। बहुता जनासी ॥ ४८॥
 म्हणोनि नवविधा भजन। जेथें प्रतिष्ठलें साधन । हें सद्गुरूचें लक्षण। श्रोतीं वोळखावें ॥ ४९॥
 अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान। बाह्य निष्ठेचें भजन । तेथें बहु भक्त जन। विश्रांति पावती ॥ ५०॥
 नाहीं उपासनेचा आधार। तो परमार्थ निराधार । कर्मेंविण अनाचार। भ्रष्ट होती ॥ ५१॥
म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन। स्वधर्मकर्म आणि साधन । कथा निरूपण श्रवण मनन। नीति न्याये मर्यादा ॥ ५२॥
यामधें येक उणें असे। तेणें तें विलक्षण दिसे । म्हणौन सर्वहि विलसे। सद्गुरुपासीं ॥ ५३॥
 तो बहुतांचें पाळणकर्ता। त्यास बहुतांची असे चिंता । नाना साधनें समर्था। सद्गुरुपासीं ॥ ५४॥
साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे। तो मागुतां सवेंच भ्रष्टे । याकारणे दुरीद्रष्टे। माहानुभाव ॥ ५५॥
आचार उपासना सोडिती। ते भ्रष्ट अभक्त दिसती । जळो तयांची महंती। कोण पुसे ॥ ५६॥
कर्म उपासनेचा अभाव। तेथें भकाधेसि जाला ठाव । तो कानकोंडा समुदाव। प्रपंची हांसती ॥ ५७॥
नीच यातीचा गुरु। तोही कानकोंड विचारु । ब्रह्मसभेस जैसा चोरू। तैसा दडे ॥ ५८॥
 ब्रह्मसभे देखतां। त्याचें तीर्थ नये घेतां । अथवा प्रसाद सेवितां। प्राश्चित पडे ॥ ५९॥
तीर्थप्रसादाची सांडी केली। तेथें नीचता दिसोन आली । गुरुभक्ति ते सटवली। येकायेकी ॥ ६०॥
गुरुची मर्यादा राखतां। ब्राह्मण क्षोभती तत्वतां । तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां। गुरुक्षोभ घडे ॥ ६१॥
 ऐसीं सांकडीं दोहींकडे। तेथें प्रस्तावा घडे । नीच यातीस गुरुत्व न घडे। याकारणें ॥ ६२॥
 तथापि आवडी घेतली जीवें। तरी आपणचि भ्रष्टावें । बहुत जनांसी भ्रष्टवावें। हें तों दूषणचि कीं ॥ ६३॥
 आतां असो हा विचारू। स्वयातीचा पाहिजे गुरु । नाहीं तरी भ्रष्टाकारु। नेमस्त घडे ॥ ६४॥
 जे जे कांहीं उत्तम गुण ॥ तें तें सद्गुरूचें लक्षण । तथापि संगों वोळखण। होये जेणें ॥ ६५॥
 येक गुरु येक मंत्रगुरु। येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु । येक वस्तादगुरु येक राजगुरु। म्हणती जनीं ॥ ६६॥
येक कुळगुरु येक मानिला गुरु। येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु । येक असद्गुरु येक यातिगुरु। दंडकर्ते ॥ ६७॥
 येक मातागुरु येक पितागुरु। येक राजागुरु येक देवगुरु । येक बोलिजे जगद्गुरु। सकळकळा ॥ ६८॥
 ऐसे हे सत्रा गुरु। याहिवेगळे आणीक गुरु । ऐक तयांचा विचारु। सांगिजेल ॥ ६९॥
 येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु। येक म्हणती प्रतिमागुरु । येक म्हणती स्वयें गुरु। आपला आपण ॥ ७०॥
जे जे यातीचा जो व्यापारु। ते ते त्याचे तितुके गुरु । याचा पाहातां विचारु। उदंड आहे ॥ ७१॥
असो ऐसे उदंड गुरु। नाना मतांचा विचारु । परी जो मोक्षदाता सद्गुरु। तो वेगळाचि असे ॥ ७२॥
नाना सद्विद्येचे गुण। याहिवरी कृपाळूपण । हें सद्गुरूचें लक्षण। जाणिजे श्र

Browse Pages

About स्वामी रामदास समर्थ
Categories

Did you know?
The deepest cave in the world is the "Lamprechtsofen-Vogelshacht" cave which can be found in Salzburg, Austria. The cave is 5,354 feet deep.

Heh Heh Heh...
What kind of doctor treats ducks?
A quack!

© 2008 Saj Infotech • All rights reserved.