Home Marathi
 

Dasbodh dashak - 7 by स्वामी रामदास समर्थ

[Oct 31, 2007]

॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक ७ ॥
सप्तम दशक । समास पहिला : मंगलाचरण श्रीराम ॥
विद्यावंतांचा पूर्वजू। गजानन एकद्विजू । त्रिनयन चतुर्भुजू। परशुपाणि ॥ १॥
 कुबेरापासून अर्थ। वेदांपासून परमार्थ । लक्ष्मीपासून समर्थ। भाग्यासी आले ॥ २॥
 तैशी मंगळमूर्ती आद्या। तियेपासून झाल्या सकळ विद्या । तेणें कवि लाघवगद्या। सत्पात्रें जाहलीं ॥ ३॥
 जैशीं समर्थाचीं लेकुरें। नाना अलंकारीं सुंदरें । मूळपुरुषाचेनि द्वारें। तैसे कवी ॥ ४॥
 नमूं ऐशिया गणेंद्रा। विद्याप्रकाशपूर्णचंद्रा । जयाचेनि बोधसमुद्रा। भरतें दाटे बळें ॥ ५॥
जो कर्तृत्वास आरंभ। मूळपुरुष मूळारंभ । जो परात्पर स्वयंभ। आदि अंतीं ॥ ६॥
 तयापासून प्रमदा। इच्छाकुमारी शारदा । आदित्यापासून गोदा। मृगजळ वाहे ॥ ७॥
जे मिथ्या म्हणतांच गोंवी। मायिकपणें लाघवी । वक्तयास वेढा लावी। वेगळेपणें ॥ ८॥
 जे द्वैताची जननी। कीं ते अद्वैताची खाणी । मूळमाया गवसणी। अनंत ब्रह्मांडांची ॥ ९॥
 कीं ते अवडंबरी वल्ली। अनंत ब्रह्मांडें लगडली । मूळपुरुषाची माउली। दुहितारूपें ॥ १०॥
 वंदूं ऐशी वेदमाता। आदिपुरुषाची जे सत्ता । आतां आठवीन समर्था। सद्गुरूसी ॥ ११॥
जयाचेनि कृपादृष्टी। होय आनंदाची वृष्टी । तेणें गुणें सर्व सृष्टी। आनंदमय ॥ १२॥
कीं तो आनंदाचा जनक। सायुज्यमुक्तीचा नायक । कैवल्यपददायक। अनाथबन्धू ॥ १३॥
 मुमुक्षचातकीं सुस्वर। करुणां पाहिजे अंबर । वोळे कृपेचा जलधर। साधकांवरी ॥ १४॥
कीं तें भवार्णवींचें तारूं। बोधें पाववी पैलपारू । महाआवर्तीं आधारू। भाविकांसी ॥ १५॥
कीं तो काळाचा नियंता। नाना संकटीं सोडविता । कीं ते भाविकाची माता। परम स्नेहाळ ॥ १६॥
 कीं तो परत्रींचा आधारू। कीं तो विश्रांतीचा थारू । नातरी सुखाचें माहेरू। सुखरूप ॥ १७॥
 ऐसा सद्गुरु पूर्णपणीं। तुटे भेदाची कडसणी । देहेंविण लोटांगणीं। तया प्रभूसी ॥ १८॥
 साधु संत आणि सज्जन। वंदूनियां श्रोतेजन । आतां कथानुसंधान। सावध ऐका ॥ १९॥
संसार हाचि दीर्घ स्वप्न। लोभें वोसणती जन । माझी कांता माझें धन। कन्या पुत्र माझे ॥ २०॥
ज्ञानसूर्य मावळला। तेणें प्रकाश लोपला । अंधकारें पूर्ण झाला। ब्रह्मगोळ अवघा ॥ २१॥
नाहीं सत्वाचें चांदणें। कांहीं मार्ग दिसे जेणें । सर्व भ्रांतीचेनि गुणें। आपेंआप न दिसे ॥ २२॥
देहबुद्धिअहंकारे। निजले घोरती घोरे । दुःखें आक्रंदती थोरे। विषयसुखाकारणें ॥ २३॥
निजले असतांचि मेले। पुनः उपजतांच निजले । ऐसे आले आणि गेले। बहुत लोक ॥ २४॥
निदसुरेपणेंचि सैरावैरा। बहुतीं केल्या येरझारा । नेणोनियां परमेश्वरा। भोगिले कष्ट ॥ २५॥
 त्या कष्टांचें निरसन। व्हावया पाहिजे आत्मज्ञान । म्हणोनि हें निरूपण। अध्यात्मग्रंथीं ॥ २६॥
सकळ विद्यामध्यें सार। अध्यात्मविद्येचा विचार । दशमाध्यायीं शार्ङ्गधर। भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७॥
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ याकारणें अद्वैतग्रंथ। अध्यात्मविद्येचा परमार्थ । पावावया तोचि समर्थ। जो सर्वांगें श्रोता ॥ २८॥
जयाचें चंचळ हृदय। तेणें ग्रंथ सोडूंचि नये । सोडितां अलभ्य होय। अर्थ येथींचा ॥ २९॥
 जयास जोडला परमार्थ। तेणें पहावा हा ग्रंथ । अर्थ शोधितां परमार्थ। निश्चयो बाणे ॥ ३०॥
 जयास नाहीं परमार्थ। तयास न कळे येथींचा अर्थ । नेत्रेंविण निधानस्वार्थ। अंधास न कळे ॥ ३१॥
 एक म्हणती मराठें काये। हें तों भल्यानें ऐकों नये । तीं मूर्खें नेणती सोयें। अर्थान्वयांची ॥ ३२॥
लोहाची मांदूस केली। नाना रत्नें सांठविलीं । तीं अभाग्यानें त्यागिलीं। लोखंड म्हणोनि ॥ ३३॥
 तैशी भाषा प्राकृत। अर्थ वेदांत आणि सिद्धांत । नेणोनि त्यागिती भ्रांत। मंदबुद्धीस्तव ॥ ३४॥
अहाच सांपडतां धन। त्याग करणें मूर्खपण । द्रव्य घ्यावें सांठवण। पाहोंचि नये ॥ ३५॥
परिस देखिला अंगणीं। मार्गीं सांपडला चिंतामणी । अव्हा वेल महागुणी। कूपामध्यें ॥ ३६॥
तैसें प्राकृतीं अद्वैत। सुगम आणि सप्रचीत । अध्यात्म लाभे अकस्मात। तरी अवश्य घ्यावें ॥ ३७॥
 न करितां व्युत्पत्तीचा श्रम। सकळ शास्त्रार्थ होय सुगम । सत्समागमाचें वर्म। तें हें ऐसें असे ॥ ३८॥
जें व्युत्पत्तीनें न कळे। तें सत्समागमें कळे । सकळ शास्त्रार्थ आकळे। स्वानुभवासी ॥ ३९॥
म्हणोनि कारण सत्समागम। तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम । जन्मसार्थकाचें वर्म। वेगळेंचि असे ॥ ४०॥
 भाषाभेदाश्च वर्तन्ते अर्थ एको न संशयः । पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥ १॥
भाषापालटें कांहीं। अर्थ वाया जात नाहीं । कार्यसिद्धि ते सर्वही। अर्थाचपासीं ॥ ४१॥
तथापि प्राकृताकरितां। संस्कृताची सार्थकता । येऱ्हव्हीं त्या गुप्तार्था। कोण जाणे ॥ ४२॥
आतां असो हें बोलणें। भाषा त्यागून अर्थ घेणें । उत्तम घेऊन त्याग करणें। सालीटरफलांचा ॥ ४३॥
 अर्थ सार भाषा पोंचट। अभिमानें करवी खटपट । नाना अहंतेनें वाट। रोधिली मोक्षाची ॥ ४४॥
 शोध घेतां लक्ष्यांशाचा। तेथें आधीं वाच्यांश कैंचा । अगाध महिमा भगवंताचा। कळला पाहिजे ॥ ४५॥
 मुकेपणाचें बोलणें। हें जयाचें तोचि जाणें । स्वानुभवाचिये खुणें। स्वानुभवी पाहिजे ॥ ४६॥
अर्थ जाणे अध्यात्माचा। ऐसा श्रोता मिळेल कैंचा । जयासि बोलतां वाचेचा। हव्यासचि पुरे ॥ ४७॥
परीक्षावंतापुढें रत्न। ठेवितां होय समाधान । तैसें ज्ञानियापुढें ज्ञान। बोलावें वाटे ॥ ४८॥
मायाजाळें दुश्चित होय। तें निरूपणें कामा नये । संसारिका कळे काय। अर्थ येथींचा ॥ ४९॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन । बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ १॥
व्यवसायी जो मळिण। त्यासि न कळे निरूपण । येथें पाहिजे सावधपण। अतिशयेंसीं ॥ ५०॥
नाना रत्नें नाना नाणीं। दुश्चितपणें घेतां हानी । परीक्षा नेणतां प्राणी। ठकला तेथें ॥ ५१॥
 तैसें निरूपणीं जाणा। आहाच पाहतां कळेना । मराठेंचि उमजेना। कांहीं केल्या ॥ ५२॥
 जेथें निरूपणाचे बोल। आणि अनुभवाची ओल । ते संस्कृतापरी सखोल। अध्यात्मश्रवण ॥ ५३॥
 माया ब्रह्म वोळखावें। तयास अध्यात्म म्हणावें । तरी तें मायेचें जाणावें। स्वरूप आधीं ॥ ५४॥
माया सगुण साकार। माया सर्व विकार । माया जाणिजे विस्तार। पंचभूतांचा ॥ ५५॥
माया दृश्य दृष्टीस दिसे। मायाभास मनास भासे । माया क्षणभंगुर नासे। विवेकें पाहतां ॥ ५६॥
माया अनेक विश्वरूप। माया विष्णूचें स्वरूप । मायेची सीमा अमूप। बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७॥
माया बहुरूप बहुरंग। माया ईश्वराचा संग । माया पाहतां अभंग। अखिल वाटे ॥ ५८॥
माया सृष्टीची रचना। माया आपली कल्पना । माया तोडितां तुटेना। ज्ञानेंविण ॥ ५९॥
 ऐशी माया निरूपिली। स्वल्प संकेतें बोलिली । पुढें वृत्ति सावध केली। पाहिजे श्रोतीं ॥ ६०॥
पुढें ब्रह्मनिरूपण। निरूपिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान। एकसरें ॥ ६१॥
 हरिः ॐ तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥

जय जय रघुवीर समर्थ ..
समास दुसरा : ब्रह्मनिरूपण श्रीराम ..
ब्रह्म निर्गुण निराकार। ब्रह्म निःसंग निराकार । ब्रह्मास नाहीं पारावार। बोलती साधू ॥ १॥
ब्रह्म सर्वांस व्यापक। ब्रह्म अनेकीं एक । ब्रह्म शाश्वत हा विवेक। बोलिला शास्त्रीं ॥ २॥
ब्रह्म अच्युत अनंत। ब्रह्म सदोदित संत । ब्रह्म कल्पनेरहित। निर्विकल्प ॥ ३॥
ब्रह्म दृश्यावेगळें। ब्रह्म शून्यत्वानिराळें । ब्रह्म इन्द्रियांच्या मेळें। चोजवेना ॥ ४॥
ब्रह्म दृष्टीस दिसेना। ब्रह्म मूर्खास असेना । ब्रह्म सद्गुरुविण येइना। अनुभवासी ॥ ५॥
ब्रह्म सकळांहूनि थोर। ब्रह्मा ऐसें नाहीं सार । ब्रह्म सूक्ष्म अगोचर। ब्रह्मादिकांसी ॥ ६॥
 ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें। बोलिजे त्याहूनि अनारिसें । परी तें श्रवणअभ्यासें। पाविजे ब्रह्म ॥ ७॥
 ब्रह्मास नामें अनंत। परी तें ब्रह्म नामातीत । ब्रह्मास हे दृष्टांत। देतां न शोभती ॥ ८॥
ब्रह्मासारिखें दुसरें। पाहतां काय आहे खरें । ब्रह्मीं दृष्टांतउत्तरें। कदा न साहती ॥ ९॥
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥ जेथें वाचा निवर्तती। मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती । ऐसें बोलिती श्रुती। सिद्धांतवचन ॥ १०॥
कल्पनारूप मन पाहीं। ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं । म्हणोनि हें वाक्य कांहीं। अन्यथा नव्हे ॥ ११॥
आतां मनासि जें अप्राप्त। तें कैसेनि होईल प्राप्त । ऐसें म्हणाल तरी कृत्य। सद्गुरुविण नाहीं ॥ १२॥
 भांडारगृहें भरलीं। परी असती आडकलीं । हातास न येतां किल्ली। सर्वही अप्राप्त ॥ १३॥
 तरी ते किल्ली कवण। मज करावी निरूपण । ऐसी श्रोता पुसे खूण। वक्तयासी ॥ १४॥
 सद्गुरुकृपा तेचि किल्ली। जेणें बुद्धी प्रकाशली । द्वैतकपाटें उघडलीं। एकसरां ॥ १५॥
 तेथें सुख असे वाड। नाहीं मनासी पवाड । मनेंविण कैवाड। साधनांचा ॥ १६॥
त्याची मनाविण प्राप्ती। कीं वासनेविण तृप्ती । तेथें न चले व्युत्पत्ती। कल्पनेची ॥ १७॥
 तें परेहुनी पर। मनबुद्धिअगोचर । संग सोडितां सत्वर। पाविजे तें ॥ १८॥
संग सोडावा आपुला। मग पहावें तयाला । अनुभवी तो या बोला। सुखावेल गा ॥ १९॥
आपण म्हणजे मीपण। मीपण म्हणजे जीवपण । जीवपण म्हणजे अज्ञान। संग जडला ॥ २०॥
 सोडितां तया संगासी। ऐक्य होय निःसंगासी । कल्पनेविण प्राप्तीसी। अधिकार ऐसा ॥ २१॥
 मी कोण ऐसें नेणिजे। तया नांव अज्ञान बोलिजे । अज्ञान गेलिया पाविजे। परब्रह्म तें ॥ २२॥
 देहबुद्धीचें थोरपण। परब्रह्मीं न चले जाण । तेथें होतसे निर्वाण। अहंभावासी ॥ २३॥
ऊंच नीच नाहीं परी। रायारंका एकच सरी । झाला पुरुष अथवा नारी। तरी एकचि पद ॥ २४॥
 ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें। शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें। तेथें असेचिना ॥ २५॥
 ऊंच ब्रह्म तें रायासी। नीच ब्रह्म तें परिवारासी । ऐसा भेद तयापाशीं। मुळींच नाहीं ॥ २६॥
 सकळांस मिळोन ब्रह्म एक। तेथें नाहीं अनेक । रंक अथवा ब्रह्मादिक। तेथेंचि जाती ॥ २७॥
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ। तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ । सकळांसि मिळोनि एकचि स्थळ। विश्रांतीचें ॥ २८॥
 गुरुशिष्यां एकचि पद। तेथें नाहीं भेदाभेद । परी या देहाचा संबंध। तोडिला पाहिजे ॥ २९॥
 देहबुद्धीच्या अंतीं। सकळांसि एकचि प्राप्ती । एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति। हें श्रुतीचें वचन ॥ ३०॥
 साधु दिसती वेगळाले। परी ते स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले। देहातीत वस्तु ॥ ३१||
 ब्रह्म नाहीं नवें जुनें। ब्रह्म नाहीं अधिक उणें । उणें भावील तें सुणें। देहबुद्धीचें ॥ ३२॥
देहबुद्धीचा संशयो। करी समाधानाचा क्षयो । चुके समाधानसमयो। देहबुद्धियोगें ॥ ३३॥
 देहाचें जें थोरपण। तेंचि देहबुद्धीचें लक्षण । मिथ्या जाणोन विचक्षण। निंदिती देह ॥ ३४॥
 देह पावे जंवरी मरण। तंवरी धरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन। देहबुद्धि मागुती ॥ ३५॥
 देहाचेनि थोरपणें। समाधानासि आणिलें उणें । देह पडेल कोण्या गुणें। हेंही कळेना ॥ ३६॥
 हित आहे देहातीत। म्हणोनि निरूपिती संत । देहबुद्धीनें अनहित। हो) ऊंचि लागे ॥ ३७॥
सामर्थ्यबळें देहबुद्धि। योगियांस तेही बाधी । देहबुद्धीची उपाधी। पैसावों लागे ॥ ३८॥
म्हणोनि देहबुद्धि झडे। तरीच परमार्थ घडे । देहबुद्धीनें बिघडे। ऐक्यता ब्रह्मींची ॥ ३९॥
 विवेक वस्तूकडे ओढी। देहबुद्धि तेथूनि पाडी । अहंता लावूनि निवडी। वेगळेपणें ॥ ४०॥
विचक्षणें याकारणें। देहबुद्धि त्यजावी श्रवणें । सत्य ब्रह्मीं साचारपणें। मिळोन जावें ॥ ४१॥
 सत्य ब्रह्म तें कवण। ऐसा श्रोता करी प्रश्न । प्रत्युत्तर दे आपण। वक्ता श्रोतयासी ॥ ४२॥
म्हणे ब्रह्म एकचि असे। परी तें बहुविध भासे । अनुभव देहीं अनारिसे। नाना मतीं ॥ ४३॥
 जें जें जया अनुभवलें। तेंचि तयासी मानलें । तेथेंचि त्याचें विश्वासलें। अंतःकरण ॥ ४४॥
ब्रह्म नामरूपातीत। असोनि नामें बहुत । निर्मळ निश्चळ निवांत। निजानन्द ॥ ४५॥
 अरूप अलक्ष अगोचर। अच्युत अनंत अपरंपार । अदृश्य अतर्क्य अपार। ऐशीं नामें ॥ ४६॥
नादरूप ज्योतिरूप। चैतन्यरूप सत्तारूप । स्वस्वरूप साक्षरूप। ऐशीं नामें ॥ ४७॥
शून्य आणि सनातन। सर्वेश्वर आणि सर्वज्ञ । सर्वात्मा जगज्जीवन। ऐशीं नामें ॥ ४८॥
 सहज आणि सदोदित। शुद्ध बुद्ध सर्वातीत । शाश्वत आणि शब्दातीत। ऐशीं नामें ॥ ४९॥
विशाळ विस्तीर्ण विश्वंभर। विमळ वस्तु व्योमाकार । आत्मा परमात्मा परमेश्वर। ऐशीं नामें ॥ ५०॥
 परमात्मा ज्ञानघन। एकरूप पुरातन । चिद्रूप चिन्मात्र जाण। नामें अनाम्याचीं ॥ ५१॥
 ऐशीं नामें असंख्यात। परी तो परेश नामातीत । त्याचा करावया निश्चितार्थ। ठेविलीं नामें ॥ ५२॥
 तो विश्रांतीचा विश्राम। आदिपुरुष आत्माराम । तें एकचि परब्रह्म। दुसरें नाहीं ॥ ५३॥
तेंचि कळावयाकारणें। चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें। निश्चयो बाणे ॥ ५४॥
खोटें निवडितां एकसरें। उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्में शास्त्राधारें। बोलिजेती ॥ ५५॥
हरि ॐ तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥

समास तीसरा : चदुर्ध्शब्रह्मनिरूपण
॥श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान। आतां सांगतों ब्रह्मज्ञान । जेणें होये समाधान। साधकांचें ॥ १॥
 रत्नें साधाया कारणें। मृत्तिका लागे एकवटणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें। जाणिजे तैसीं ॥ २॥
पदार्थेंविण संकेत। द्वैतावेगळा दृष्टांत । पूर्वपक्षेंविण सिद्धांत। बोलतांचि नये ॥ ३॥
आधीं मिथ्या उभारावें। मग तें ओळखोन सांडावें । पुढें सत्य तें स्वभावें। अंतरीं बाणे ॥ ४॥
म्हणोन चौदा ब्रह्मांचा संक

Browse Pages

About स्वामी रामदास समर्थ
Categories

Did you know?
The famous Casanova (Giacomo Casanova) was a librarian for many years before he died.

Heh Heh Heh...
Mummy and daddy had taken little Benjy to Blooms kosher restaurant.
During their first course, Benjy says, “This soup tastes funny, daddy.”
His daddy replies, “So why aren’t you laughing?”

© 2008 Saj Infotech • All rights reserved.