Home Marathi Lekh
 

Mark Twain by संचिता दिवेकर

[Sep 12, 2007]

अमेरिकन विनोदाला स्वतंत्र अस्तित्व आणि प्रतिमा मिळवून देणाऱ्या मार्क ट्वेन यांचा जन्म ३० सप्टेंबर १८३५ रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यामध्ये झाला तर मृत्यु २१ एप्रिल १९१० मध्ये झाला. सॅम्युएल लॉंगहॉर्न क्लेमेन्स हे त्यांचे मूळ नाव. वयाच्या १२ व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याने हालअपेष्टांचे जीवन त्यांच्या वाट्याला आले. प्रेस मध्ये खिळे जुळविणे, रिव्हर बोटचा पायलट, अमेरिकेच्या यादवी युध्दामध्ये सैनिक म्हणून कामगिरी आणि नंतर पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत काम केल्याने वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांशी त्यांचा संबंध आला. त्यातूनच त्यांना नर्मविनोदी लिखाणाची शिदोरी मिळाली.
अमेरिकेच्या यादवी युध्दाच्या समाप्तीनंतर ते व्हर्जिनीयामध्ये ’टेरिटोरियल एन्टरप्राईझ’ या नियतकालिकाचे संपादन सुरु करु लागले. त्यामध्ये ३ फेब्रुवारी १८६३ रोजी त्यांनी उपरोधिक शैलीत मार्क ट्वेन या टोपण नावाने प्रवासवर्णन लिहिले. हे त्यांचे टोपण नावच पुढे प्रचलित झाले. ’द ऍडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर’ आणि ’द प्रिन्स ऍण्ड द पॉपर ’ (१८८१), ’लाइफ ऑन द मिसिसिपी’(१८८३) आणि ’द ऍदव्हेंचर्स ऑफ हकलबरी फीन’ या कादंबर्ऱ्यांनी मार्क ट्वेन जगविख्यात झाले. टॉम सॉयर आणि हकलबरी फीन या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये नायक असलेला लहान मुलगा घरातून पळून जातो आणि मुक्त, साहसी व आनंदी जिवनाचा अनुभव घेतो असे चित्रण केले आहे. ’फास्टरफेणे’ फेम भा. रा. भागवत यांनी मराठीत ’ऍडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फीन’ या कादंबरीचे भाषांतर ’भटकबहद्दर’ या नावाने केले.
मार्क ट्वेन हे आपल्या मार्मिक सुभाषितांसाठी अत्यंत प्रसिध्द आहेत. ’सिगरेट सोडणे किती सोपे आहे ते मी वारंवार सिगरेट सोडून सिध्द केले आहे.’, ’मी आणि ज्ञान यात एक अडसर होता - तो म्हणजे शाळा’, ’देवाच्या दयेने आपल्या अमेरिकेकडे तीन गुण आहेत एक म्हणजे भाषण स्वातंत्र्य, दुसरे म्हणजे विवेक आणि तिसरा म्हणजे हे दोन्ही गुण कधीही न वापरण्याचं शहाणपण’ ही त्यांची सुभाषितेच त्यांच्या विनोदी लेखनाची मर्म उघड करतात.

Browse Pages

About संचिता दिवेकर
Categories

Did you know?
Adolf Hitler was born in Austria.

Heh Heh Heh...
When my mother was called for jury duty, she felt confident of her ability to answer the questions asked of prospective jurors.
As a young attorney, I had filled her in on what to expect.
Asked about the occupations of family members, Mom answered, "My son is a lawyer."
As a follow-up, she was asked if she had ever used the services of an attorney.
"Only to mow my lawn."

© 2008 Saj Infotech • All rights reserved.