| Sajinfotech.com |
|
Karl Marx by संचिता दिवेकर[Sep 05, 2007]
मानवी विचारविश्वात क्रांती घडवून आणणाऱ्या मार्क्स यांचा जन्म ५ मे १८१८ साली जर्मनीत झाला तर मृत्यु १४ मार्च १८८३ साली झाला. त्यांची आई वडील अतिशय धर्मिक होते. परंतु मार्क्स तरुण वयातच लोकशाही, निरीश्वरवाद या तत्वांचा पुरस्कार करु लागले. उच्च शिक्षणासाठी प्रथम ते बॉन येथे आणि नंतर बर्लिनला गेले. ग्रीक तत्वज्ञानातील प्रमेयांची तुलना करणारा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळवली. परंतु बंडखोर विचारांमुळे त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला व संपादकही झाले. १८४९ मध्ये ते इंग्लंडला वास्तव्यासाठी आले आणि शेवटपर्यंत तेथेच राहिले. उत्पादनाच्या साधनांची खासगी मालकी संपुष्टात आणली तरच शोषक-शोषित हे वर्ग नसलेला वर्गविहीन समाज प्रत्यक्षात येईल, असे मार्क्स यांचं म्हणणं होतं. १८५९ पासून दास कॅपिटल हा आपला श्रेष्ठ ग्रंथ लिहिण्यास मार्क्स यांनी सुरुवात केली. या त्रिखंडात्मक ग्रंथामधून मार्क्स यांनी भांडवलशाहीचे शास्त्रीय विवेचन केले आहे. जोपर्यंत जगात विषमता आहे, शोषित वर्ग आहे, तोपर्यंत मार्क्स यांचे नाव घेउन शोषितजन पुनःपुन्हा उठाव करतील. जगातील कामगारांनो, एक व्हा ,तुमच्या बेड्या सोडून तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, असे आवाहन कार्ल मार्क्स यांनी कामगारांना उद्देशून केले होते. एका पत्रात मार्क्स यांनी लिहिले आहे, व्यवहारी माणसे व त्यांचे शहाणपण याची मला फार गंमत वाटते. आपले मन दगडासारखे कठोर असेल तरच व्यवहारी माणसाप्रमाणे मानवजातीय दुःखाकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन स्वतःच्या सुखाकडे लक्ष देता येते. परंतु मला ते शक्यच नव्हते.
| |
|
|
|
|
|